Pune News : मैत्रीचे संबंध, एक कोटी घेऊन गाडीही घेतली अन् नंतर खोट्या गुन्ह्याची धमकीच मिळाली, पुण्यात धक्कादायक प्रकार…

Pune News : मैत्रीचे संबंध ठेवून लोणावळा येथील फार्म हाऊससाठी जागा विकत देतो, शेअर मार्केटमधून उत्तम कमाई करुन देतो, असे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार कोरेगाव पार्कमधील गुरुदत्त अॅव्हेन्यू मध्ये मार्च २०२३ ते १८ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला आहे.

याप्रकणी कर्वेनगर येथील राहणार्या एका ५६ वर्षाच्या नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी निशुन राधेशाम पटेल (वय ३९), मधुबाला राधेशाम पटेल (दोघे रा. गुरुदत्त अॅव्हेन्यू, कोरेगाव पार्क) आणि विवेकआनंद देवन शेनॉय (वय ६९, रा. पॉप्युलर हाईटस बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ,या जेष्ठ नागरिकाशी पटेल दांपत्याने मैत्रीचे संबंध ठेवले. त्यांचा विश्वास संपादन करत शेअर मार्केटमध्ये खूप पैसे मिळतात असे सांगितले. त्याचबरोबर लोणावळा येथे फार्म हाऊस साठी कमी किमतीत जागा मिळते ती तुम्हाला विकत घेऊन देऊ असे आश्वासन देत त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी बारा लाख ५० हजार रुपये घेतले. Pune News

मात्र एवढे पैसे घेऊनही शेअर मार्केटचेही पैसे मिळाले नाहीत आणि लोणावळ्यातील जागाही विकत दिली नाही, मुळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक झालीच नाही, तसेच जेष्ठ नागरिक वापरत असलेली गाडी हे दांपत्य स्वतःच घेऊन गेले. या सगळ्या गोष्टीमुळे आपली फसवणूक झाली याची पक्की खात्री झाल्याने त्या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास फौजदार दीपक जाधव करत आहेत.