Crime News : घटस्फोटानंतर पत्नीवर जबरदस्ती बलात्कार, पुण्यात भयंकर घटना, हादरवणारी माहिती आली समोर…


Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.घटस्फोटानंतर पत्नीवर जबरदस्ती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकणी ३१ वर्षाच्या महिलेने जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून अत्याचार केल्याची खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३२ वर्षाच्या तिच्या पूर्वपतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ ऑगस्ट २०२४ ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी पती हा खासगी नोकरी करत आहे. फिर्यादीबरोबर त्याचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात कुरबुरी सुरु होत्या. त्यातूनच ते वेगळे राहू लागले. जुलै २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर दोघे जण वेगवेगळे राहत होते. Crime News

वर्षभरानंतर त्यांचा एकमेकांशी पुन्हा संपर्क झाला. त्याने पुन्हा लग्न करतो, असे फिर्यादीला वचन दिले. तिचा विश्वास संपादन करुन तिच्यासोबत पुन्हा जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.

दरम्यान, त्यानंतर त्याने आता पुन्हा लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर करत आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!