सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सोने चांदीच्या दरात झाली घसरण! जाणून घ्या आजचे दर…

Gold Silver Price : गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे. कधी सोने चांदीचे दर वाढलेले दिसून येते तर कधी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येते. आज सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोने १३० रूपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी ६४० रूपयांनी स्वस्त झाली आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण सोने चांदीचा दर जाणून घेऊ या

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,४६३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,९६० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९१९ रुपये आहे म्हणजेच चांदी ९१,८६० रुपये प्रति किलो आहे. एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ७६,७२० होता तर चांदीचा दर ९२३२० रुपये प्रति किलो होता.
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.