पुण्यात खळबळ! तरुणाचा दारू पिऊन हवेत गोळीबार, नेमकं घडलं काय?

pune : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.एक तरुणाने दारू चक्क पिऊन हवेत गोळीबार केला आहे. वाघोली परिसरात ही घटना घडली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.महत्त्वाचे म्हणजे या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल कोलते असं या आरोपी तरुणाचे नाव आहे.गुरुवारी त्याचा मित्र संदीप हरगुडे याला रुग्णवाहिकेतून व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यात येत होते. यावळी विशालने त्याला विरोध केला. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात नेऊ नये, अशी मागणी त्याने केली

विशालच्या विरोधानंतरही व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी संदीपला जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवले. त्यावेळी संतापलेल्या विशालने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी फायर केली. तसेच दगडाने रुग्णावाहिकेच्या काचाही फोडल्या. अखेर संदीपला रुग्णवाहिकेतून खाली उत्तरवण्यात आलं.
या घटनेनंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी विशाल कोलते याला ताब्यात घेतले. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच यावेळी संदीप आणि विशाल दोघेही दारु प्यायला होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.