Pune News : नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली अन्…!! पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाज झाला सुन्न…


Pune News : पुणे शहरात माय-लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने मन सुन्न झाले आहे.

पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमधील ही घटना घडली आहे. याठिकाणी पोलिसांच्या मदतीने या बालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटेननंतर स्थानिकानी नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त करत भावना व्यक्त केल्या. चिमुकल्या बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती.

याबाबत माहिती अशी की, रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर, सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तसेच याबाबत तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे. Pune News

सध्या बालकाची तब्बेत स्थिर आहे. या बाळाला सोडून पसार होणाऱ्या व्यक्तीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे हा प्रकार कसा झाला याचा तपास गांभीर्याने सुरू करण्यात आला आहे.

तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड पोलीस घेत आहेत. याबाबत हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आले आहे का? याचा देखील तपास सुरू करण्यात आला आहे. अनेकदा अशा घटना घडत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!