पुण्यात उडाली खळबळ! पुण्यात पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त…!


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला असून पिस्तुल तस्करी करणार्‍या दोन मुख्य डिलरसह सात जणांना बेड्या ठोकल्या. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

25 फेब्रुवारी रोजी पोलिस पथकास पिस्टल विक्री करणारे दोन डीलर वाघोली परिसरातील नानाश्री लॉज याठिकाणी आल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले होते.

आरोपी हनुमंत गोल्हार, प्रदीप गायकवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून गावठी बनवटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे सापडली. ही पिस्तुले त्यांनी विक्रीकरीता आणली होती. त्यांच्याकडून 17 पिस्तुले, 13 जिवंत काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाईल फोन असा तब्बल 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही पिस्तुले मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणल्याने पुन्हा एकदा पिस्तुल तस्करीचे मध्यप्रदेश कनेक्शन उघड केले आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट 6 आणि युनिट 1 ने संयुक्तिकरित्या केली. याप्रकरणी हनुमंत अशोक गोल्हार (वय- 24), प्रदीप विष्णू गायकवाड (वय -25 मूळ रा. बीड), शुभम विश्वनाथ गर्जे (25), अरविंद श्रीराम पोटफोडे (38), ऋषिकेश सुधाकर वाघ ( 25), अमोल भाऊसाहेब शिंदे (25, सर्व रा. अहमदनगर) आणि साहिल तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (21, रा. वरची आळी, सुसगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तपासात गोल्हार हा नवी मुंबई येथील दोन कोटी 80 लाख रुपयांच्या दरोडा घातल्या प्रकरणात फरार असल्याचे समोर आले आहे. गोल्हार याच्याकडून पिस्तुल विकत घेणारे पोटफोडे, गर्जे , वाघ, शिंदे यांना अटक केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!