मध्य रेल्वे वाढविणार मुंबई-पुणे – नागपूर दरम्यान फेऱ्या ! कोणत्या पर्वाला सुरुवात करणार या विशेष गाड्या …..


Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान मध्य रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार असल्याची बातमी हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.

याही वर्षी यादरम्यान रेल्वे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. दरम्यान याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई/पुणे आणि नागपूर आणि नागपूर – भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवणार अशी माहिती समोर आली आहे.

यामुळे मुंबई पुणे नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना या गाड्यांचा फायदा होणार आहे. या काळात होणाऱ्यां अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी या गाड्या फायदेशीर ठरतील असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.

यामुळे जर तुम्हीही या काळात रेल्वेने प्रवास करू इच्छित असाल तर तुम्हाला नक्कीच या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण या विशेष गाड्यांचे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!