Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? कोंढव्यात पाच वर्षांच्या चिमुकल्यावर अश्लील व्हिडीओ दाखवत सामूहिक अत्याचार, घटनेने उडाली खळबळ..

Pune Crime : पुण्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. ती म्हणजे पाच वर्षांच्या अल्पवयीन बालकावर तिन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केला आहे. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पाच वर्षांच्या अल्पवयीन बालकावर तिन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केला आहे. पीडित अल्पवयीन मुलाला पॉर्न व्हिडिओ दाखवत तीन जणांनी त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, पीडित पाच वर्षांचा मुलगा हा सोसायटीत खेळत असताना तिघांनी त्याला मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याच्यावर अत्याचार केला.पीडित मुलाच्या मोठ्या भावासमोरच आरोपींनी हे कृत्य केले आहे. Pune Crime


दरम्यान, या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.