Rahul Gandhi : ब्रेकिंग! राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाचे समन्स, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण नेमकं काय?

Rahul Gandhi : लोकसभा विरोधीपक्ष नेते तसेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुणे उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहेत. तसेच त्यांना २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला असून न्यायालयाने याप्रकरणी काँग्रेस नेत्याला समन्स बजावले आहेत.
वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला होता. इंग्लंडच्या दौऱ्यात मार्च २००३ साली राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीबाबत बदनामीकारक विधान केल्याचा आरोप वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केला होता. Rahul Gandhi

वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याचा त्यांनी आरोप केला होता.

सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी ५ मार्च २०२३ रोजी इंग्लंड येथे केलेल्या एका भाषणाचा व्हिडीओ यासाठी सादर केला होता. या प्रकरणी राहुल गांधी यांना २३ ऑक्टोबर रोजी पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.