Ajit Pawar : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार सोडणार पक्ष, दादांचे टेंशन वाढले…
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच आता सलग सहा वेळा मोठ्या मताधिक्क्याने माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अजितदादा गटाचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मात्र अजितदादांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावेळी ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत असून त्यांनी शरद पवारांची यासंदर्भात अनेक वेळा भेट घेतली आहे.
कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचेकडे रणजीत शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिका घेतल्याने आता अजितदादांच्या अडचणीत वाढ होणार आहे. महायुतीतील तुमचं फिक्स तिकीट का नाकारता या विषयावर त्यांनी तो विषय आता संपलेला आहे, अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा व महायुतीला निरोप दिला आहे. Ajit Pawar
शरद पवार यांनी रणजीत शिंदे यांना तुतारी न दिल्यास राष्ट्रवादी अर्थात घड्याळावर उभे न राहता अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवण्याची भूमिका बबनदादांनी घेतल्याने आता अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार कोण हा प्रश्न पुन्हा अनुत्तरीत राहणार आहे.
काही दिवसांपूर्वी अजितदादांसोबत माढा आणि करमाळा या दोन्ही ठिकाणी स्टेजवर दिसणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी आता मात्र तुतारी न मिळविल्यास अपक्ष मुलाला उतरवणार अशी भूमिका घेतल्याने बबन दादांचा अजित पवार यांच्यावरील विश्वास संपला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमदार शिंदे यांचे दुसरे बंधू आणि करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच गेल्यावेळी प्रमाणे आपण याही वेळी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, अजित दादांना आता या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण द्यायचा हा पेच निर्माण होणार आहे.