Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा, हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला? घटनेनंतर संजय राऊत यांचे गंभीर आरोप…


Akshay Shinde Encounter  : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली.

आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपासवर झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवला आहे.

संजय राऊत यांनी एक्स या समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात दिसून येत आहे की, अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात आहेत. त्यावेळी त्याचे हात बांधलेले असून तोंडावर बुरखा घालण्यात आलेला आहे. यावरून संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. Akshay Shinde Encounter

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे, फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!