होळकरवाडीत शेतकऱ्यांनी केली आफूचीच शेती ; लोणीकाळभोर पोलिसांकडून दोघांना बेड्या …!

उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत होळकरवाडी कानिफनाथ डोंगराचे पायथ्याशी शेतात आफींम (आफू ) शेती केल्याप्रकरणी दोघा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

राजाराम होळकर व बाळू कटके असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना मिळालेल्या खबरीवरुन पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर शेतीची पाहणी केली असता , त्यांना एकूण 11 60,000 रुपये किंमतीची एकूण 116 कीलो वजनाचे 1374 अफू ची झाडे आढळून आली आहे.

त्यानुसार लोणीकाळभोर पोलिसांनी आरोपींवर 176/2023 NDPS कलम 8 ब, 18 सह भा द वि 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक असून पुढील तपास सुरू आहे.

Views:
[jp_post_view]