Nilesh Lanke : निलेश लंकेंचा विजयानंतर मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, विजयासाठी मला भाजपच्या…


Nilesh Lanke : देश आणि राज्याप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातही भाजपच्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी मोठी आघाडी घेत भाजपच्या डॉ. सुजय विखे यांचा पराभव केला आहे.

अशातच आता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली, मात्र आता त्यांचं नाव घेणे योग्य ठरणार नाही असं म्हणत त्यांनी गौप्यस्फोट देखील केला.

तसेच आता दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहे. शरद पवार मला दिल्ली शिकवणार असल्याचे निलेश लंके म्हणाले. विजयानंतर ते नगरमध्ये माध्यमांशी बोलत होत. Nilesh Lanke

निलेश लंके म्हणाले, विजयानंतर पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबत माझं फोनवरून बोलणं झाले आहे. मी त्यांना भेटण्यासाठी कधी येऊ विचारले असता ते दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितल. तसेच त्यांनी मला दिल्ली शिकवतो असं म्हटलं आहे.आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण देखील करणार आहे.

दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विजयाच्या जवळ आल्यानंतर त्यांनी मतमोजणी केंद्रात येऊन कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष केला. हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे.

भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले. सोबतच आता कुणाबद्दलही काहीही बोलायचे नाही असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!