Pune Accident : पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीची हौस आली जीवाशी! पिकअप चालवताना दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू…

Pune Accident : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील हिट अँड रन प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता शिरुर तालुक्यातही एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहू पिकअपने मोटार सायकलसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेले.
या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा गंभीररित्या जखमी झाला आहे. Pune Accident

मिळालेल्या माहिती नुसार, पिकअप क्रं एम एच १२ एस एफ ३४३९ अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी चालवत होती. तिच्यासोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते.
सदर मुलीने तिच्या ताब्यातील सदरचा पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरुन धडक देऊन सदरचा अपघात केला. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.