Shaniwar Wada : मोठी बातमी! शनिवारवाड्याजवळ बेवारस बॅग, परिसरात खळबळ, बॉम्बशोधक पथकही दाखल…


Shaniwar Wada : पुण्यातील शनिवार वाड्याजवळ बेवारस बॅग आढळून आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बॉम्बशोधक पथक शनिवार वाड्यावर दाखल झालेला आहे वाडा पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे या बेवारस बॅग ची सध्या तपासणी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅस असल्याचा फोन पोलिसांना करण्यात आला होता. त्यानंतर बेवारस बॅग सापडल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावले होते. त्यानंतर बॉम्ब शोधन पथकाने तपास सुरु केला आहे. Shaniwar Wada

दरम्यान, शनिवारी सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने लोक शनिवार वाडा पाहण्यासाठी आले होते. पोलिसांनी सर्व पर्यटकांना शनिवार वाड्यातून बाहेर काढले आहे. परिसराला घेरण्यात आले असून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आपले काम करत आहे. पण, सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!