Uruli Kanchan : सोरतापवाडीत दारूच्या बिलावरुन बियरबार फोडले, वाहने तोडली! एकाच आठवड्यात आरोपींचे दुसरं गुन्ह्याचं कृत्य..!!


Uruli Kanchan उरुळी कांचन : सोरतापवाडीत येथे दारूचे बिल मागितल्याचा कारणावरून हॉटेलच्या मँनेजरला व कामगारांना लोखंडी पाईपने मारहान करून शिवीगाळ करून बियरबार फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना बुधवारी (ता.२९) १०. ३० वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी (ता.हेवली) गावचे हद्दीत नायगाव फाटा येथील हाँटेल अभिराज रेस्टो अँन्ड बार मध्ये घडली आहे. याप्रकणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकणी मोहन वासु गौड (वय.४३ धंदा मँनेजर रा. हाँटेल अभिराज नायगाव फाटा सोरतापवाडी ता. हवेली जि. पुणे मुळ गाव महाराज बिल्डींग ब्राम्हनगर ता. माझगाव जि. बेळगाव कर्नांटक) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार स्वप्निल चैधरी (रा. पेठ वडाची वाडी ता. हवेली जि. पुणे), यश पुर्ण नाव माहीत नाही, नंदु उर्फ हनुमंत चोरगे (रा. म्हातोबाची आळंदी ता. हवेली जि. पुणे), यश संपत चैधरी रा. वडाची वाडी पेठ ता. हवेली जि. पुणे), शिवम शिवरकर रा. म्हातोबाची आळंदी ता. हवेली जि. पुणे), उत्कर्ष बाबर रा. सोरतापवाडी कड वस्ती ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, वरील नमूद केलेलं सर्व आरोपी हाँटेल अभिराज रेस्टो. अँन्ड बार मध्ये आले होते. फिर्यादी यांनी परमिट रूममधे पिलेल्या दारूचे बिल मागीतले. या कारणावरून आरोपींना राग आला.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व कामगारांना लोखंडी पाईपने मारहान शिवीगाळ दमदाटी करून बारच्या शटरवर दगडफेक करून वाहने तोडली. यानंतर तेथून पळ काढला.

याप्रकणी आरोपींविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एकाच आठवड्यात आरोपींनी दुसरे गुन्ह्याचे कृत्य असल्याचे समोर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!