Pune Accident : अल्पवयीन मुलाचा रक्ताचा रिपोर्ट कोणी बदलला, पोलीस तपासात खरा मास्टरमाईंड आला समोर…

Pune Accident : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहे. यात अनेक जण गोत्यात येत आहे, पुणे पोलिसांनी या प्रकरणी तपास वेगाने सुरू केला आहे. अशातच आता या अपघातातील अल्पवयीन आरोपींबाबत मोठा खुलासा झाला आहे.

पुणे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी केवळ पैसे घेऊन अल्पवयीन मुलाचा रक्ताचा अहवालच बदलला नाही, तर लाचेच्या बदल्यात त्यांनी वडील आणि आजोबांना वैद्यकीय समस्या उद्भवणार नाही, असे वचन दिले होते.
त्यांनी शारिरीक तपासणीत आरोपीला क्लीनही दिले होते. रविवारी (ता.१९) भरधाव वेगात आलेल्या पोर्श कारने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली, यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला.अल्पवयीन आरोपीचे ब्लड बदलल्या प्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. Pune Accident

सध्या या डॉक्टरांची चौकशी सुरु आहे. दरम्यान आता या मागील मास्टरमाइंड कोण याबाबत माहिती समोर आली आहे. ब्लडचा नमुना बसलल्याचा मास्टरमाइंड हा डॉ. अजय तावरे हाच होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
दरम्यान, दुसरीकडे, या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक केली असून, अमित घाटकांबळे असे त्याचे नाव आहे. तो ससून हॉस्पिटलमध्ये शिपाई म्हणून काम करतो, त्याने ३ लाख रुपयांची लाच घेऊन एका डॉक्टरला दिल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच मुळात एका व्यक्तीकडून दुसऱ्याला देण्यासाठी लाचेचे पैसे घेण्याचे काम केले.