Accident News : पाण्याचा टँकर- इर्टिंगा कारचा भीषण अपघात, सहा जण जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना…

Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर पाण्याचा टँकर आणि इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.
हा अपघात मंगळवारी (ता.२८ ) दुपारी बाराच्या सुमारास दौंड तालुक्यातील खडकी येथे झाला. खडकी येथे महामार्गाच्या दुभाजकातील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला भरधाव वेगातील कारची पाठीमागून धडक बसली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. Accident News
दौंड तालुक्यातील खडकी येथे लक्ष्मीनाराण मंगल कार्यालयाजवळ दुभाजकामधील झाडांना टँकरने पाणी घातले जात होते. त्यावेळी सोलापूर कडून पुण्याला येणाऱ्या भरधाव इर्टिगा गाडी (एमएच 14 एलबी 7071) टँकरला पाठीमागून जोरात धडकली. अपघातात इर्टिगा गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणारे सहा जण जखमी झाले असून त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत
अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आहे. झाडांना पाणी घालणाऱ्या टँकर चालकाने पाठीमागे रिफ्लेक्टर लावले असते तर अपघात झाला नसता. टँकर चालकाने रिफ्लेक्टर न लावल्यामुळे अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.