Ajit Pawar : जगण्याची लढाई संपली अन् पैशांची अडचण आली, मग मदतीला अजितदादा धावून आले, दादांचा एक फोन अन्…

Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीची जनता यांच्यात अतूट बंधन आहे. अजित पवार हे नेहमीच लोकांच्या समस्या सोडवत असतात. आज संध्याकाळी देखील अशीच घटना घडली आहे.

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी मधील समीर बागवानांची आजाराबरोबरची लढाई संपली. बागवानांनी जगाचा निरोप घेतला. समीर बागवान हे गेल्या पंधरा दिवसांपासून न्युमोनिया आजाराने त्रस्त होते.
परवा त्यांना पूना हॉस्पिटलमधे दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले. दवाखान्याचे १ लाख रुपये बिल शिल्लक असल्याने कुटुंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यास दवाखाना व्यवस्थापन टाळाटाळ करीत होते.

काऱ्हाटी गावचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयास कळवली. तेथे उपस्थित असलेले अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने दवाखाना व्यवस्थापनाशी संपर्क साधला. Ajit Pawar
मुसळे यांनी लागलीच हलवलेल्या यंत्रणेमुळे दवाखाना व्यवस्थापनाने अवघ्या अर्ध्या तासातच एकही रुपया न घेता समीर बागवान यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला. दुःखाचा डोंगर सभोवताली असला तरी देखील ही लाख मोलाची दिलासा देणारी घटना बागवान कुटुंबासाठी अत्यंत कृतज्ञतेची ठरली.
दरम्यान, बारामती तालुका अशा अनेक लाख मोलाच्या मदतीचा साक्षीदार गेल्या एक वर्षात बनला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वैद्यकीय मदत कक्षाने आज देखील ही चुणूक दाखवली.