Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन…


Prataprao Bhosale : राज्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री प्रतापराव भोसले यांचं आज (ता.१९) सातारमध्ये निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांनी काम केले होते.

कॅबिनेटमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मतक पदे भूषवली. ते काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष होते. प्रतावराव भोसले चारवेळा आमदारकी जिंकताना कमी वयामध्ये आमदार होण्याचा मान मिळवला होता.

प्रतापराव भोसले यांच्या निधनानं, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री प्रतापराव भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Prataprao Bhosale

प्रतापराव बाबुराव भोसले यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९३४ रोजी सातारा जिल्ह्यातील भुईंजमध्ये झाला. त्यांनी सातारा मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केलं. प्रतापराव भोसले ८व्या, ९व्या आणि १०व्या लोकसभेसाठी निवडून आले होते. १९६७ ते १९८५ पर्यंत ते वाई मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.

प्रतापराव बाबुराव भोसले यांचा जन्म २५ऑक्टोबर १९३४ रोजी सातारा जिल्ह्यातील भुईंजमध्ये झाला. त्यांनी सातारा मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केलं. प्रतापराव भोसले ८व्या, ९व्या आणि १०व्या लोकसभेसाठी निवडून आले होते. १९६७ ते १९८५ पर्यंत ते वाई मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!