Sharad Pawar : मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, सुप्रियाला फक्त खासदारकी दिली तर अजित पवारांना.., शरद पवार यांनी केला मोठा खुलासा


Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीतून पुन्हा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना काय कमी केले, नेहमी सर्व सत्तापदे त्यांना दिली. सुप्रियाला फक्त खासदारकी दिली. मी पुतण्या आणि मुलगी असा भेद कधीच केला नाही, असे शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का? होय, मला संधी मिळाली असती. मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी मिळाली नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केला होता. त्या आरोपाला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले, मी कधीही पुतण्या आणि मुलगी यांच्यात भेद केला नाही. यामुळे सुप्रिया सुळे हिला फक्त खासदारकी दिली. आता ती लोकसभेत पक्षाची गटनेता आहे. ती दिल्लीच्या राजकारणात आहे. परंतु तिला कधीही सत्तापद दिले नाही. दुसरीकडे अजित पवार यांना कायमच सत्तापदे दिली. Sharad Pawar

दरम्यान, त्याचबरोबर पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार यांना राज्यांमध्ये मंत्री केले. अनेक कॅबिनेट मंत्रीपदे देताना त्यांना सर्व महत्त्वाची खाती देखील दिली. एक दोन नव्हे तर तीन वेळा उपमुख्यमंत्री पद दिले. विधिमंडळातील गटनेते पद देखील अजित पवार यांना दिले हे सर्व दिलं अजून काय हवे होते. असा प्रश्न देखील शरद पवारांनी अजित पवार यांना विचारला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!