Pune Crime : पुण्यात भरदिवसा सोन्याच्या दुकानावर दरोडा, पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोज अनेक घटना समोर येत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातुन दरोड्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरांनी चक्क पोलीस स्टेशन हद्दीतील सोन्याच्या दुकानांवर दरोडा टाकल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. Pune Crime

७ अनोळखी व्यक्ती मास्क लावून आले आणि मोहम्मद वाडी रोड वारकर मळा या ठिकाणी बीजीएफ ज्वेलर्स या दुकानावर त्यांनी दरोडा टाकला. यामध्ये दरोडेखोरांनी जवळपास ३०० ते ४०० ग्राम सोने लंपास केले आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास वानवडी पोलीस करत आहेत. मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस कसून प्रयत्न करत आहेत.

गुन्हेगारीच्या घटनेत वाढ..

गुन्हेगारीच्या घटनांना काही पूर्णविराम मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शस्त्राचा धाक दाखवत पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!