Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का! होमपिचवर बड्या नेत्याने सोडला पक्ष…


Eknath Shinde :  लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या टप्प्यात सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यामध्येच आता एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे.

शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अरविंद मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. Eknath Shinde

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेत व्यासपीठावर स्थान न मिळाल्यामुळे अरविंद मोरे यांनी पक्षाची साथ सोडल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक कार्यक्रमात ते आघाडीवर होते.

दरम्यान, त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा पत्र देखील पाठवले आहे. दरम्यान कल्याण मधील मतदान दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे.

यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच अरविंद मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच अरविंद मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!