Maratha Reservation : सॉरी मम्मी-पप्पा! तरुण मराठा आंदोलकाने उचलले टोकाचे पाऊल, घटनेने सगळे हादरले…


Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षण मिळत नाही.

तसेच दिवसागणिक डोक्यावर कर्जाचा वाढत्या भाराच्या दडपणाखाली एका तरुण मराठा आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. या तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सऍपवर मॅसेज करत आपल्या आत्महत्येचे कारणही सांगितले आहे. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. दत्ता कालीदास महिपाल असे या तरुणाचे नाव आहे. त्याने सुसाईड नोट लिहून ती आपल्या भावाला व्हाट्सएपवर पाठवली होती.

तो मूळचा बीड जिल्ह्यातील संभाजीनगरच्या वाळूज भागातील वडगाव कोल्हाटी या गावात राहत होता. काही मराठा तरुणांनी सरकार आरक्षणाची मागणी मान्य करत नसल्याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली होती. आता यामध्ये अजून एक नाव आले आहे.

राज्य सरकारने त्यावेळी आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करुन हा रोष शमविण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनात हा तरुण सक्रिय होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती मिळत आहे. Maratha Reservation

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील तरुणांना आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये, यासाठी आवाहन केले आहे. मात्र, असे असले तरी मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचा हा सिलसिला काही थांबतात दिसत नाही. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!