Urfi Javed : उर्फी जावेदने केला टक्कल, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चर्चांना उधाण…

Urfi Javed : उर्फी जावेद नेहमी चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या फॅशन्स सेन्समुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत पाहायला मिळते. तिच्या कपड्यांची तुलना ही इतर कोणत्याच अभिनेत्रीसोबत केली जात नाही.
पापाराजी हे नेहमी उर्फीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतात. मात्र उर्फी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीचा टक्कल केलेला एक फोटो समोर आला आहे जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
अशा परिस्थितीत उर्फी जावेदला टक्कल पडले आहे का असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला आहे. प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे कारण अभिनेत्रीने सोमवारी, १३ मे रोजी तिच्या कारमधून सेल्फी घेतला आणि त्यात ती टक्कल अवतारात दिसत आहे.
विशेष म्हणजे उर्फीच्याच अकाऊंटवरून हा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्य वाटले, पण उर्फी जावेदला खरोखर टक्कल पडले आहे का? मात्र उर्फीने एकतर फिल्टर वापरला आहे किंवा तिचे फोटो फोटोशॉप केले होते कारण तिच्या केसांचा एक भाग तिच्या खांद्याजवळ दिसत होता, परंतु उर्फीची ही टक्कल असलेला फोटो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि जबरदस्त कमेंट करत आहेत. Urfi Javed
दरम्यान, उर्फीला टक्कल पडले नसले तरी तिने या फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. फोटो पाहून एका यूजरने लिहिले, ‘फिल्टर लावले आहे’, दुसऱ्या यूजरने ‘ओ गॉड, हे कसे झाले?’ असे लिहिले आणि ‘फेक एडिटिंग’, दुसऱ्या यूजरने लिहिले, अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट युजर करत आहेत.