Ambadas Danve : ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी, पुण्यात आरोपीला अटक, धक्कादायक माहिती उघड…

Ambadas Danve : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना समोर येत आहेत. असे असताना आता ईव्हीएम हॅक करतो म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.
याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबत पोलीस तपास करत असून सगळे हादरले आहेत.
मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याठिकाणी जेवढे एव्हिएम आहेत, ते सर्व हॅक करुन तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना फोन केला. Ambadas Danve
त्यासाठी अडीच कोटी रुपये दानवे यांच्याकडे मागण्यात आले. या संदर्भात दानवेंना संशय आणल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले. पुण्यातील एका हॉटेलमध्ये मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे. अनेक ठिकाणी याबाबत अशा प्रकारे घटना घडत आहेत, तसेच गैरप्रकार देखील केले जात आहेत.