रशियाकडून तेल खरेदीला भारताचा ब्रेक! पेट्रोल-डिझेल महागणार की स्वस्त? आजचा दर काय?

मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असतानाही आज देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. सध्या देशात पेट्रोलची सरासरी किंमत 111.21 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 97.83 रुपये प्रति लिटर आहे.
दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. देशातील इतर प्रमुख महानगरांच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर तुलनेने कमी आहेत.

मुंबईत पेट्रोलचा दर 111.31 रुपये प्रति लिटर असून डिझेल 97.97 रुपये प्रति लिटर आहे. दरम्यान, आज देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत, ते पाहूया.


शहरनिहाय पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली – पेट्रोल ₹102.12 | डिझेल ₹95.20
मुंबई – पेट्रोल ₹111.31 | डिझेल ₹97.97
फरीदाबाद – पेट्रोल ₹103.28 | डिझेल ₹96.10
चेन्नई – पेट्रोल ₹107.78 | डिझेल ₹99.56
लखनौ – पेट्रोल ₹101.86 | डिझेल ₹95.36
पटना – पेट्रोल ₹113.35 | डिझेल ₹99.36
नाशिक – पेट्रोल ₹112.46 | डिझेल ₹98.20
भोपाळ – पेट्रोल ₹115.41 | डिझेल ₹100.47
प्रयागराज – पेट्रोल ₹101.82 | डिझेल ₹95.05
रशियाकडून कच्च्या तेलाची आयात घटली
दरम्यान, भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीच्या पॅटर्नमध्येही बदल होत आहे. ऑगस्ट महिन्यात भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा कमी झाला, तर मिडल ईस्टमधून होणारा पुरवठा वाढला.
ऑगस्टमध्ये भारताने रशियाकडून केलेली कच्च्या तेलाची आयात जुलैच्या तुलनेत 16.5 टक्क्यांनी घटून सुमारे 21 लाख बॅरल प्रतिदिन (bpd) राहिली.
मिडल ईस्टमधून तेलाचा पुरवठा वाढण्यामागे संयुक्त अरब अमिरातीची सरकारी कंपनी ADNOC च्या हालचाली महत्त्वाच्या ठरल्या आहेत. कंपनीने होर्मुझ सामुद्रधुनीबाहेरील फुजैराह आणि सोहारसारख्या टर्मिनलमधून कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू केला आहे.
रशियन तेलाच्या खरेदीवर अमेरिकेचा दबाव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या Lindsey O. Graham Sanctioning Russia and Iran Act मुळे रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांसाठी आर्थिक जोखीम वाढण्याची शक्यता आहे. या कायद्यानुसार अमेरिकेच्या अध्यक्षांना रशिया किंवा इराणकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय रिफायनरींसाठी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याबाबतचे आर्थिक गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींसोबतच भारताच्या इंधन बाजारावरही या घडामोडींचा परिणाम होतो का, याकडे लक्ष लागले आहे.