Lok Sabha Election 2024 : ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबा संतापले, बारामतीत घडलं वेगळंच, जाणून घ्या….


Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघात नणंद-भावजयी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि एकाच परिवारातील दोन सदस्यांमध्ये लढत होत आहे.

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनैत्रा पवार यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. आज बारामती मतदार संघासाठी मतदान सुरु आहे. बारामतीकरांनी सलग तीनवेळा सुप्रिया सुळे यांना दिल्लीत पाठवलं आहे.

तर आता राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडल्यानंतर या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजई असा सामना रंगतोय. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात असून यावेळी त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढताय. त्यामुळे यंदा ईव्हीएमवर कमळाचे चिन्हं दिसत नाहीये. Lok Sabha Election 2024

आजोबा ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह नसल्याने संतापले…

दरम्यान, अलिकडे राज्यातील राजकीय उलथापालथ पासून अनभिज्ञ असलेल्या या सर्वसामान्य मतदारांना याची क्वचितच माहिती असते. त्यामुळे पारंपारिक भाजपचे मतदार असलेले एक आजोबा ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह नसल्याने चांगलेच संतापलेले बघायलामिळाले आहे. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानकेंद्रांवर हा प्रकार घडला असून यावेळी हे आजोबा चांगलेच संतापले होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस व बावधन बु., ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, मान, भुकूम, भुगाव, लवळे तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वारजे, शिवणे खडकवासला, खेड शिवापुर, बिबेवाडी (काही भाग) या शहरी भागाचा समावेश करण्यात आलेला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!