Viral Video : विद्यार्थीनी अचानक हवेत तरंगायला लागली, मित्रांनी संभाळण्याचा प्रयत्न केला अन्…; पुण्यातील शाळेत धडकी भरवणारा प्रकार उघड..


Viral Video : एखाद्या हॉरर चित्रपटातील सीन वाटावा असा काहीसा प्रकार पुण्यातील एका शाळेत घडल्याचे सांगणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. युजर्सने पुणे शहरातील शाळेचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला आहे.

त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ कितपत खरा आहे?, बेशुद्ध असताना हवेत अर्धवट तरंगण्याचा प्रकार काय आहे? यासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.

बघताक्षणी धडकी भरवणारी अशी ही क्लिप कितपत खरी आहे याबाबत सोशल मीडियावर नेटकरी चर्चा करत आहेत. साहजिकच या प्रकारामुळे ऑनलाईन गोंधळ चालू असल्याचे दिसतेय. असं नेमकं पुण्याच्या शाळेत घडलं तरी काय चला पाहूया.. Viral Video

‘सुहित_जाधव’ या वापरकर्त्याने Reddit वर शेअर केलेल्या, पोस्टमध्ये, आज माझ्या शाळेतील एक मुलगी भूतबाधा झाल्याप्रमाणे हवेत तरंगत होती, अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. साहजिकच काहीच तासांमध्ये हा व्हिडीओ ऑनलाईन तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये काय?

व्हिडिओमध्ये शाळेच्या ड्रेसमध्ये मुलगी दिसत आहे. बेशुद्ध असलेली ही मुलगी वर्गात अर्धवट हवेत तरंगताना दिसत आहे. तिचे तिच्या शरीरावर काहीच नियंत्रण नाही. तिला तिचे वर्गमित्र सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण तिला पकडतात. हा प्रकार पुणे शहरात कुठे घडला आहे, हे मात्र दिले नाही.

दरम्यान, अनेकांनी हा प्रकार भूतबाधा नाही, असे स्पष्ट केले आहे. त्या मुलीस काही तरी आजार झाला असणार, असा हा प्रकार आहे. काही जण म्हणतात, ती ज्या बाकावर बसली आहे, त्याचा आधार घेत उठण्याचा प्रयत्न करत आहे.

काहींनी ती मुलगी नाटक करत असल्याचा दावा केला आहे. काही युजर्सने मजेशीर कॉमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले की, त्या मुलीचा होमवर्क झाले नसणार. दुसऱ्याने म्हटले आहे, टीजर्सने सरप्राईज टेस्ट घेण्याचे म्हंटले असेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!