Crime News : लव्ह जिहाद प्रकरणाने मुंबई हादरली! निझामने केले पूनमचे तुकडे..!!

Crime News : मुंबईत श्रद्धा वालकर प्रकरण ताजे असताना आता अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याठिकाणी मानखुर्द परिसरात एका सुटकेसमध्ये एका तरुणीची डेडबॉडी सापडली असून एका टॅक्सी ड्रायव्हरने तिची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक तरुणीची सुटकेसमध्ये डेडबॉडी सापडली. निजाम नामक टॅक्सी ड्रायव्हर तिला पळवून घेऊन गेला. तो तिला कल्याणमध्ये घेऊन गेला आणि तिची हत्या केली.
यानंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी सोडला. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासनही दिले. या घटनेने मात्र सगळेच हादरले असून पोलीस तपास सुरू आहे. Crime News

याबाबत लोढा म्हणाले की, मुंबईतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईत अनधिकृतपणे राहणा-या रोहिंग्या, बांग्लादेशिंचा बंदोबस्त करावा लागेल. तसेच पूनम क्षीरसागर हिला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री, राज्य सरकारचा एक घटक म्हणून प्रयत्न करणार आहे.
या प्रकरणी २४ तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलनाचा इशाराही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला. यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.