Baba Ramdev : बाबा रामदेव पुन्हा एकदा अडचणीत! सुप्रीम कोर्टाचा पुन्हा एकदा मोठा दणका, नेमक कारण काय?


Baba Ramdev : गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. योगगुरू रामदेव बाबा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता बाबा रामदेव यांचा योग शिबीर सेवा कराच्या कक्षेत येणार आहे.

बाबा रामदेव यांच्या योग शिबिरांचे आयोजन करणाऱ्या ‘पतंजली योगपीठ ट्रस्ट’ला आता या कार्यक्रमांसाठी सेवा कर भरावा लागणार आहे. सेवाकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. Baba Ramdev

न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना पतंजली योगपीठ ट्रस्टचे अपील फेटाळून लावताना आपल्या निर्णयात म्हटले आहे की, सेवाकर अपील न्यायाधिकरणाने ते योग्यच म्हटले आहे. प्रवेश शुल्क आकारल्यानंतर शिबिरांमध्ये योगासने करणे योग्य आहे. सेवा न्यायाधिकरणाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला असून योग शिबिरांवर सेवाकर लावण्याचे समर्थन केले आहे. यामुळे रामदेव बाबांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!