लोकशाहीच्या उत्सवाला आज सुरुवात ! देशातील एकशे दोन मतदारसंघात मतदानाला सुरुवात ..!!

नवी दिल्ली :देशात लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. 21 राज्यांमधील लोकसभेच्या 102 जागांवर आज मतदान होत आहे. तामिळनाडूतील सर्व 39 जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांवर मतदान होत आहे.
महाराष्ट्रातील ज्या पाच जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे त्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात देखील आला आहे. मतदान करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीत प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आजपासून लोकशाहीचा उत्सव सुरू होत आहे. तरुण मतदारांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.