संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत युक्रेनमधून सैन्य मागे घेण्याची मागणी…!


नवी दिल्ली : युक्रेनमध्ये रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री उशिरा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) एक ठराव मंजूर करण्यात आला. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने युक्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याच्या गरजेवर ठराव मंजूर केला.

भारत-चीनसह अन्य 32 देश अनुपस्थित

या ठरावाच्या बाजूने 141 सदस्यांनी मतदान केले तर सात सदस्यांनी विरोध केला. त्याच वेळी, चीन आणि भारतासह 32 सदस्य मतदानाला अनुपस्थित राहिले. UNGA ने एक बंधनकारक नसलेला ठराव मंजूर केला आहे. या ठरावात रशियासोबतचे शत्रुत्व संपुष्टात आणण्याची आणि युक्रेनमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!