“माझ्या निवडणुकीमध्ये माझी भावंडं कधीही फिरली नाहीत, आता गरागरा फिरत आहेत; एकदा का जर “मी तोंड उघडल्यास..” अजित पवारांनी दिला कुटुंबातीलच व्यक्तींना गंभीर इशारा
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असतांना उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी कुटुंबातील व्यक्तींना इशारा दिला आहे. अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. याचा आता अजित पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे.
“माझ्या निवडणुकीमध्ये माझी भावंडं कधीही फिरली नाहीत. आता गरागरा फिरत आहेत. जशा पावसाळ्याच्या दिवसात छत्र्या उगतात तशी उगवली आहेत. मी फार तोलून मापून बोलत आहे. एकदा का जर मी तोंड उघडलं तर कित्येकांना तोंड दाखवता येणार नाही. तोंड लपवून फिरावं लागेल,” असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता.
पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी बारामती मतदारसंघातून माघार घेतली होती. त्यावेळी त्यांना इतरही अनेक फोन येत होते”, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.