Pune Crime : मित्राच्या मदतीने मुलीने काढला जन्मदात्या आईचाच काटा, घटनेने सगळेच हादरले, पुण्यात धक्कादायक प्रकार आला समोर….


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणीने मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईचाच डोक्यात हातोड्याचे घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरीत हा संपूर्ण प्रकार घडला.

खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनावही या तरुणीने केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात या तरुणीचे भिंग उघड पडले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या तरुणीच्या मित्राला अटक केली आहे.

मंगल संजय गोखले (वय. ४५, राजश्री कॉलनी वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी योशिता संजय गोखले (वय. १८) आणि तिचा मित्र यश मिलिंद शितोळे (वय. १८, गणेश नगर वडगाव शेरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. विनोद शाहू गाडे (वय. ४२) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आई घरातील मोरीत पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याचा बनावशी त्याने रचला होता. मात्र तिच्या नातेवाईकांना याबाबत शंका आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि हा संपूर्ण कट उघडकीस आला. Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता ही मंगल गोखले यांची मुलगी आहे. तिने मित्र यश शितोळे यांच्या मदतीने आईच्या बँक खात्यातून पैसे काढले होते. पैसे काढण्याचे आईला समजले तर ती रागावेल अशी भीती तिला वाटत होती. यातून तिने आईचा खून करण्याचा कट रचला. तिने मित्राला घरी बोलावले.

घरातील हातोडा त्याला दिला आणि झोपलेल्या आईच्या डोक्यात हातोड्याची घाव घालून खून करण्यात आला. यश शितोळे डोक्यात हातोडा मारत असताना योशिताने आईचे तोंड स्कार्पने दाबले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!