Lok Sabha Election 2024 : अखेर बारामती, शिरुर, मावळ अन् पुण्यात मविआचं ठरलं!! कोणत्या जागेवर कोण लढणार, जाणून घ्या संपूर्ण राज्यातील चित्र…


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत.

यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचार संहिता लागू झाली आहे. अशातच आता राजकीय पक्षांच्या बैठकांना देखील जास्त वेग आला आहे.

अशातच आता लोकसभा निवडणूक २०२४ साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना २१, राष्ट्रवादी काँग्रेस १० आणि काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे या लोकसभा मतदार संघातील जागा जाहीर करण्यात आल्या आहे. Lok Sabha Election 2024

पुणे लोकसभा कॉंग्रेस लढवणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेना लढवणार आहे. शिरुर आणि बारामती हे दोन मतदार संघत शरद पवार गटाकडून लढवण्यात येणार आहे.

बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे रवींंद्र धंगेकर, मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून संज्योग वाघेरे आणि शिरुर लोकसभा मतदार संघातून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!