Pune Accident : बिबवेवाडीमध्ये भीषण अपघात! भरधाव टेम्पोने चिमुकल्याला चिरडले, आई गंभीर जखमी…


Pune Accident : राज्यात अलीकडे अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये भरधाव टेम्पोने चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे.

रुपाली शिंदे (वय.२८ रा. शिवतेज नगर, बिबवेवाडी) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. रुद्र सचिन शिंदे (वय.४ वर्षे) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी, अप्पर उताराच्या रस्त्यावर हा चिमुकला त्याच्या आईसोबत चालला होता. इतक्यात भरधाव टेम्पो आला अन् त्याने चिमुकल्याला धडक दिली. या धडकेमुळे चिमुकला थेट टेम्पोच्या चाकाखाली आला.

या अपघातात चिमुकल्याचा टेम्पोच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. तर या भीषण अपघात चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात काल सायंकाळी म्हणजे ७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अप्पर येथे घडला आहे. या अपघातमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!