बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज कसा भरतो, तेच बघतो, ”म्हणत, काँग्रेसच्या उपाध्यक्ष रोहित बनकर यांना बेदम मारहाण


बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज कसा भरतो, तेच बघतो, असे म्हणत सहा जणांनी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्याचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांना बेदम मारहाण धक्कादायक घटना बारामतीतुन समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी बाबू पवार व त्याच्या अन्य पाच साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित बनकर हे त्यांच्या घरी असताना बाबू पवार याने त्यांना फोन करून तू कुठे आहे. मला तुला भेटायचे आहे, असे फोनवर सांगितले. मी घरी जेवण करत आहे, असे उत्तर बनकर यांनी दिले. मी घरी भेटण्यासाठी येतो, असे पवार म्हणाला.

त्यामुळे जेवण उरकून बनकर हे खाली पार्किंगमध्ये येऊन थांबले. १५ मिनिटांनी बाबू पवार, रोहन व अन्य पाच जण दुचाकीवरून तेथे आले. बाबू पवार याने बनकर यांना तू लोकसभेचा अर्ज कसा भरतो, तेच बघतो, तू अर्ज दाखल केला, तर तुला जिवानिशी खल्लास करेन, अशी धमकी दिली.

त्यानंतर त्यांच्या नाकावर मारले. त्यामुळे बनकर यांच्या नाकाला दुखापत झाली. रोहित याने त्यांचे दोन्ही हात धरले. बाबू पवार याने हाताने गळा आवळला. बनकर यांनी जोराने आरडाओरडा केल्याने लोक जमा झाल्यावर. ते तेथून दुचाचाकीवर पसार झाले, असे बनकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!