Heat Stroke : पुणेकरांनो काळजी घ्या! उष्माघाताचे ३ रुग्णांची नोंद, आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी…


Heat Stroke : उन्हाच्या झळा व वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. अशातच आता पुणे देखील चांगलेच तापू लागले आहे. हवामान बदलाचा हा फटका असून, पुणे जिल्ह्यात उष्माघाताच्या तीन रुग्णांची नाेंद झाली आहे. त्यामुळे पुण्याचीही वाटचाल उष्ण शहरांच्या दिशेने हाेत आहेत.

राज्यातील तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. राज्यात या वर्षी उष्माघाताचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत.राज्यात १ मार्चपासून उष्माघाताची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची नोंद केली जात आहे.

१ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान राज्यात उष्माघाताचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक ५ रुग्ण बुलढाणा येथील असून त्या पाठोपाठ अमरावती आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी चार रुग्णांची नाेंद झाली.

नाशिक, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्येकी तीन रुग्णांची नाेंद झाली आहे, असे आराेग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले येते. Heat Stroke

वाढत्या तापमानामुळे उष्णतेशी संबंधित आजारांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शरीरावर लाल चट्टे येणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आदी समस्यांचा सामना अनेकांना करावा लागत आहे.

राज्यातील वाढते तापमान लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!