Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! शिंदेंचे ७ खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, राजकीय घडामोडींना वेग…

Lok Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिंदेंच्या ७ खासदारांची काय गती झाली. उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

शिंदे आणि अजित पवार गटही गोंधळलेले आहेत. भाजपचीही दमछाक होत आहे. इंडिया आघाडी भाजपचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. Lok Sabha Election 2024
ते पुढे म्हणाले की, विदर्भात काँग्रेसला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. हुकूमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे.
त्यामुळे लोकांना भीती वाटते की, स्वतंत्र भारताचे उद्या आपण गुलाम असू. जनतेने ठरवले आहे की, भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर काढायचे. गडचिरोली तर आम्ही जिंकूच, भाजपला दुसरा पर्याय मिळाला नाही. गडचिरोलीत आमचे किरसान उभे आहेत, ते निवडून येतील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.