Supriya Sule : रवींद्र धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल करणाऱ्यांवर सुप्रिया सुळे बरसल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या…

Supriya Sule : विरोधकांनी रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरुन ट्रोल केले. असे ट्रोल करणे चांगले नाही मात्र रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपाला बोलायला काहीच नाही, म्हणून ते ट्रोल करत आहेत. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे पुणे दोऱ्यावर आहेत. त्यानी आज राष्ट्रवादीच्या वीज दरवाढी विरोधात असलेल्या आंदोलनाला हजेरी लावली.
यावेळी सुप्रिया सुळेंनी रवींद्र धंगेकर यांच्यावर झालेल्या ट्रोलिंग संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच त्यांनी राज्याची परिस्थिती आणि दुष्काळावरदेखील भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधकांनी रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरुन ट्रोल केले. असे ट्रोल करणे चांगले नाही मात्र रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपाला बोलायला काहीच नाही, म्हणून ते ट्रोल करत आहेत. ‘लोकांना या देशांमध्ये बदल हवाय. भ्रष्टाचाराला लोक थकले आहेत आणि कंटाळले आहेत. Supriya Sule
बेरोजगारीला कंटाळले आहे. लोक महागाईला कंटाळले आहेत आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात महिलांच्या विरोधातील आहेत. त्यामुळे लोकांना आता बदल हवाय. हा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.