Loksabha Election 2024 : तिकीट कापलेले भाजप खासदार शिवबंधन बांधणार? आज ठाकरे गटात सामील होणार…


Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

अशातच आता भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज दुपारी १२ वाजता उन्मेष पाटील यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे. उन्मेष पाटील यांनी मंगळवारी थेट मुंबईत दाखल होत खासदार संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. Loksabha Election 2024

त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, एकीकडे तिकीट कापलेले भाजप खासदार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!