Lok Sabha Election : मोठी बातमी! उदयनराजे यांचा पत्ता कट होणार? महत्वाची माहिती आली समोर…


Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

तर मागील काही दिवसांपासून साताऱ्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उभे राहणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. असे असतानाच उदयनराजेंचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात आता पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉ. सुरेश भोसले किंवा डॉ. अतुल भोसले किंवा नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांच्यात लढत होणार असल्याच्या चर्चा आहेत. Lok Sabha Election

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर जनसामान्यात स्वच्छ प्रतिमा असणारा ताकदीचा उमेदवार महायुतीला किंवा भाजपला द्यावा लागेल. तसेच साताऱ्यात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे सध्या पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत येत आहे.

दरम्यान, भाजप आणि महायुतीला सातारा लोकसभेसाठी उमेदवारीची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्याशिवाय उदयनराजे भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत देखील अतिशय चुरशीची होऊ शकते. त्यामुळे आता भाजप कोणता उमेदवार देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!