Viral News : IAS अधिकारी महिलेचा पती हॉटेलमध्ये परदेशी महिलेसोबत करत होता धक्कादायक कृत्य, पोलिसांनी दरवाजा उघडला अन्….

Viral News : सध्या एका महिला IAS ऑफिसरच्या पतीची सर्वत्र चर्चा आहे. पंजाबमधील लुधियानामध्ये एका आयएएस अधिकारी महिलेचा पती एका परदेशी महिलेसोबत हॉटेलमध्ये अश्लील चाळे करताना पकडला गेला आहे.
पोलिसांनी याबाबतची माहिती आयएएस अधिकाऱ्याला दिली असता त्यांनी पतीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. आयएएस अधिकाऱ्याच्या पतीच्या या कृत्याची बातमी काही वेळातच संपूर्ण पंजाबमध्ये पसरली.
सविस्तर माहिती अशी की, लुधियाना पोलीस स्टेशन डिव्हिजन नंबर ५ च्या पोलिसांना काही दिवसांपासून माहिती मिळाली होती की येथील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात आहे. अनेकदा काही लोक देशी-विदेशी मुलींसोबत येथील हॉटेलमध्ये ये-जा करताना दिसतात.
खोल्याही बनावट आयडीवर लोकांना भाड्याने दिल्या जातात. गेल्या शुक्रवारीही काही लोक परदेशी तरुणीसोबत हॉटेलमध्ये घुसल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना मिळाली होती. Viral News
यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाच्या गेटसमोर असलेल्या हॉटेलवर छापा टाकला. तेथून दोन पुरुष आणि दोन महिलांना रंगेहात पकडले. चौकशीदरम्यान एका व्यक्तीची पत्नी पंजाबमध्ये आयएएस अधिकारी असल्याचे समोर आले.
त्यावेळी पत्नीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करायला सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.