Pakistan Lashkar Terrorist : पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा मृत्यू, 26/11 हल्ल्याचा होता मास्टरमाइंड…

Pakistan Lashkar Terrorist : अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये मारल्या गेलेल्या लष्कराच्या दहशतवाद्यांना ठार केल्याचा आरोप पाकिस्तानने भारतीय एजन्सीवर केला आहे, परंतु भारताने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.
पाकिस्तान सतत भारतावर कुरघोडी करत असते. पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर अनेक हल्ले केले आहेत. भारताने देखील त्याला प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने मुंबईमध्ये २००८ साली खूप मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला होता.
अशातच आता पाकिस्तानच्या जिहादी वर्तुळात एका वेगळ्या कारणावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच, पाकिस्तानातील फैसलाबाद येथे लष्कराचा गुप्तचर प्रमुख आझम चीमा याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याचे वय ७० वर्षे होते. Pakistan Lashkar Terrorist
तो 26/11 च्या दहशतवादी हल्ला, जुलै २००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट आणि भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा प्रमुख सूत्रधार होता. त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच भारतीय यंत्रणांच्या दाव्याला बळ मिळाले आहे.
गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, तो पंजाबी बोलत होता आणि तो लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता. तो 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तानातील बहावलपूर येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. विशेष म्हणजे अनेकदा सहा अंगरक्षकांसह लँड क्रूझरमध्ये फिरताना दिसत होता. पण इस्लामाबादने या बाबत नकार दिला आहे.