Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची तब्येत खालावली, नाकातून रक्त, उपचारास नकार….

Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून चौथ्यांदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्यात येत आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
अशातच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यानी १० फेब्रुवारीपासून पाण्याचा घोटही घेतलेला नसून, उपचार घेण्याससुद्धा नकार दिला आहे.
आज त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मराठा आंदोलक चिंतेत आहेत. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषणावर आपण ठाम आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांना अशक्तपणा आला आहे. Manoj Jarange Patil
त्यांना उठायला, बोलायलाही त्रास होत आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने आता सरकारपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची दखलही घेण्यात आलेली नाही.
दरम्यान, सोमवारी रात्री अंतरवाली सराटीमध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल स्वतः त्यांच्या भेटीला पोहोचले होते. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत जरांगे मात्र उपोषणावर ठाम आहेत.