Ayodhya Ram Mandir : सोरतापवाडीच्या रामवाटिका ऍग्रो बायोटेक कंपनीला आयोध्येतील राम मंदिराच्या सजावटीचा मान, बिंटू पवार व सहकाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण ..!!

Ayodhya Ram Mandir उरुळीकांचन : संपूर्ण भारतवर्षासह जगभरात श्री रामलल्लांचा प्रतिष्ठापनेचा अमंग उत्साह साजरा करण्यात येत आहे. पाचशे वर्षानंतरआयोध्या भूमीत प्रभूश्रीरामांच्या मंदिराची उभारणी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.२२ मिनिटांनी मूर्तीची विधिवत प्रतिष्ठाणा झाली. लखलख साजावटीने तयार करण्यात आलेल्या या मंदिरात गर्भगृह, मंदिर परिसर फुलांनी सजावटीचा मान देशात नर्सरी उद्योगाचा हब असलेल्या हवेली तालुक्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) येथील राम वाटिका ऍग्रो बायोटेक कंपनीला मिळाला आहे. मंदिर लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण गर्भगृहाची व मंदिराची सजावट करण्याचा अभिमान रामवाटीका ऍग्रो बायोटेक कंपनीचे मालक बिटू पवार यांना मिळाला आहे.
अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज केली गेली आहे. संपूर्ण देशभरात आज या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली आहे. रामजन्मभूमीवरील राममंदिरात आज प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मंदिराला फुलांच्या सजावटीसाठी शोभिवंत फुलझाडे पुरविण्याचे आणि सजावटीचे काम सोरतापवाडी (ता.हवेली) येथील रामवाटिका या कंपनीने केले आहे.
रामवाटिकेच्या वतीने अयोध्येतील राममंदिराच्या सजावटीसाठी सुमारे साडेसात हजार शोभीवंत फुलझाडे वापरण्यात आल्याची माहिती व्यावसायिक बिटू पवार यांनी दिली. जागतिक व देशपातळीवरील नर्सरी प्रदर्शनात असलेला सहभाग व अहमदाबाद, केवाडीया येथील स्टॅ्याच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात केलेले सजावटीचे काम हे रामजन्मभूमी विश्वस्त समितीच्या नजरेस भरल्याने विश्वस्त समितीने रामवाटिका कंपनीला सजावटीची जबाबदारी सोपविली होती.
मूळचे फलटणचे असलेले आणि सोरतापवाडी, उरुळीकांचन येथे नर्सरी व्यावसायिक असलेले बिंटू पवार आणि त्यांचे सहकारी विजय कदम, सचिन ब्राह्मणकर आणि संज शाह यांच्यामाध्यमाने राम रोपवाटिकेच्या वतीने सेवाकार्य करण्यात केले आहे. बिंटू पवार हे राममंदिराच्या सजावटीची माहिती देताना म्हणाले, आम्ही चौघेजण महिनाभरापासून याची योजना करत आहोत, तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने १०० कारागीर मदतीसाठी देण्यात आले. १६ जानेवारी पासून आम्ही हे सजावटीचे कार्य करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने मंदिराचा मुख्य गाभारा, आणि मंदिराच्या बाहेरील भागाची सजावट आम्ही केली आहे. Ayodhya Ram Mandir
बिंटू पवार पुढे म्हणाले, माझ्यासाठी हा जीवनातील अविस्मरणीय आणि सर्वांत सुखद अनुभव आहे. आम्ही हे कार्य करत असताना व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता केवळ सेवाभाव ठेऊन काम केले आहे. आम्हाला रामलल्लाची सेवा करायला मिळत आहे हे आमचे परम भाग्य आहे. मंदिर सजावटीसाठी स्वतः या सोरतापवाडी तसेच पुणे परिसर ,बरेली, नवी दिल्ली, लखनौ आणि पुणे येथून शोभिवंत फुलझाडे आणण्यात आली असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.
बिंटू पवार यांची रामवाटिका बायोटेक कंपनी ही भारतीय शेतकरी आणि रोपवाटिकांना नाविन्यपूर्ण जागतिक दर्जाची दर्जेदार रोपे उपलब्ध करून देणारी अग्रगण्य रोपे तयार करणारी कंपनी आहे. रामवाटिका ॲग्रीबायोटेक एलएलपी ची स्थापना उरुळीकांचन, सोरतापवाडी परिसरात १९ जानेवारी २०२१ मध्ये झाली आहे.
रामवाटिका ही कंपनी भारतातील अग्रगण्य रोपे तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. बिंटू पवार यांच्यासह कोरेगावमूळ (ता. हवेली ) येथील प्रसिद्ध नर्सरी व्यावसायिक संतोष शितोळे यांच्या बालाजी नर्सरीज मधून राम मंदिराच्या सजावटीसाठी उच्च प्रतिची रोपे खरेदी झाली आहेत.
कशा प्रकरची रोपे होतात तयार..
या कंपनीमध्ये मोसमी क्रायसॅन्थेमम आणि झेंडूच्या खुल्या शेतात मूळ असलेल्या तरुण रोपे, जीरॅनियम तरुण रोपे, कोको-पीटमधील शोभेच्या एनपी आणि टिश्यू कल्चर, नेट पॉट्स, पॉली हाऊस, नेट हाऊस, फॉगर्स आणि इतर अत्याधुनिक वनस्पती संरक्षण आणि पोषण उपकरणे द्वारे प्रदान केलेल्या नियंत्रित परिस्थितीत माती, ट्रे मध्ये आधुनिक जातीची आकर्षक रोपे तयार केले जातात.