लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असलेल्या परिचारिकेचा खून…!


मुंबई : सहा महिन्यांपासून लिव्ह -इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह चटईत गुंडाळून ठेवला घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पालघरमधील तुळींज पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघा शाह (४०) असे मृत प्रेयसीचे नाव असून नालासोपारा येथील विजयनगर परिसरातील एका फ्लॅटमधून तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तुळींज पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु केला आहे.

हार्दिक असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून तो फरार होता. मेघा एका रुग्णालयात परिचारिकेचे काम करत होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!