रुग्णांसाठी जीवनदान महागले ! आता रक्ताच्या किमतीही वाढल्या !

पुणे : रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबत दिवसेंदिवस रक्ताची कमतरताही भेडसावत आहे. अशातच शासनाने रक्ताचे दर वाढवल्याने नवीन दरानुसार खासगी रक्त पिढ्यामध्ये पिशवीमागे १०० रुपये तर, शासकीय घाटी रुग्णालयात २५०रुपये वाढले आहे. शनिवारपासून घाटीत बाहेरच्या रुग्णांसाठी १ हजार १०० रुपयांना रक्त बॅग झाली. त्यामुळे या महागाईचा सामना आता रुग्णांना करावा लागणार आहे.
याचदरम्यान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्ताचे नवीन दर जाहीर केले आहे. यापुढे धर्मादाय, खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या बाटलीची किंमत १ हजार ४५० वरुन १ हजार ५५०रुपये इतकी झाली आहे. तर सरकारी रक्तपेढ्यांमध्ये १ हजार ५० रुपयांवरुन १ हजार १०० इतकी झाली आहे.
तर घाटीत दाखल झालेल्या रुग्णांना मोफत रक्त शासकीय घाटी रुग्णालयात रक्ताच्या पिशवीचे दर वाढवण्यात आले असले, तरीही घाटीत दाखल रुग्णांना रक्त मोफत दिले जाते. मात्र बाहेरच्या रुग्णांसाठी रक्तपिशवी ८५० रुपयांना होती. इतर सरकारी रक्तपेढ्यांच्या तुलनेत दर कमी होते. मात्र आता शासन निर्देशानुसार शनिवारपासून रक्तपिशवीचे ११०० रुपये नवीन दर लागू झाले, असल्याची माहिती घाटीतील शासकीय रक्तपेढीचे अधिकारी डॉ. अनिल जोशी यांनी माध्यमांना दिली आहे.