Woman Beauty Tips : महिलांनो घरच्या घरी व्हा सुंदर, जाणून घ्या काही घरगुती उपाय…

Woman Beauty Tips उरुळीकांचन :सुंदर दिसायला सगळ्यांनाच आवडतं पण त्यासाठी प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रीटमेंट घ्यायला प्रत्येकालाच परवडेलच असं नाही. पण म्हणून नाराज व्हायची काहीच गरज नाही. घरगुती उपायांनीही तुमचं सौंदर्य वाढवू शकता. Woman Beauty Tips
चेहऱ्यावर काळे डाग : ज्यांच्या चेहऱ्यांवर काळे डाग, पिंपल्स असतील त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूर डाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावावी. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.
पिंपल्स व डोळ्याखालील वर्तुळे : पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.
निस्तेज चेहरा : चंदन पावडर, एक चमचा मंजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, अर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.
मुरुम : कोरफडीचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडीने रंग गोरा होतो व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत, त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडीच्या गराने फेशिअल करावे.
आता काही वेगळे : पाच मिनिटात करा मेकअप
स्त्रियांना तयार होणायासाठी खूप वेळ लागतो असं नेहमीच म्हटलं जातं. त्यावर कित्येक विनोद केले जातात. मात्र खरं पाहिलं तर अनेकींना ड्रेस, ज्वेलरी, मेकअप मग शूज असं काहीना काहीतरी वेळच्या वेळी सापडत नाही आणि मग उशीर होतो.
भग अनेकदा जिथे पोहोचायचं असेल तिथे आपण वेळेत पोहोचू शकत नाही. तेव्हा जर पाच मिनिटांत तयार व्हायचं असेल तर तुम्ही काय कराल ? हा प्रश्न विचारल्यावर तुमची उत्सुकता नक्कीच ताणली गेली असेल. तर त्यासाठी या स्मार्ट टिप्स तुम्हांला
नक्की उपयोगी पडतील.
• प्रथम त्वचेवर मॉइश्चरायझर लावा. तसंच आय क्रीम आणि सनस्क्रीन लावून घ्या.
• पटकन तयार होणायासाठी तुम्ही बेबी क्रीम वापरू शकता किंवा तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार लाईट फाऊंडेशनची निवड करा आणि त्यानंतर हलकासा एका पावडरचा हात द्या.
• तुम्ही गालांवर एक गुलाबी रंगाचा हलकासा ब्रश फिरवू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याला उठाव मिळेल,
• डोळ्यांच्या मेकअपसाठी साधा लायनर किंवा मस्कारा वापरा आणि लिपस्टिक आणि त्यानंतर ग्लॉसचा वापर करा.
• लक्षात ठेवा, यापूर्वी तुम्ही ड्रेस आणि ज्वेलरी, शूज यांचं मॅचिंग लक्षात ठेवून हे सर्व केलं पाहिजे.